Madhi Kanifnath Temple
Pathardi Ahmednagar (मढ़ी)
नगर-पाथर्डी मार्गावरील निवडुंगे गावापासून वरती डोंगराकडे जानारया फाट्याने थोड्या अंतरावर मढ़ी येथे नवनाथापैकी कनिफनाथांची संजीवन समाधी मंदिर आहे. नगरपासून मंदिराचे अंतर ५१ कि .मी . आहे. होली ते गुढीपडवा या दरम्यान येथे फार मोठी यात्रा भरते. सर्व भटक्या जातीजमातीचे जतीमधील न्यायनिवाडे 'जातपंचायत' मार्फ़त केले जातात .होली पटवायाचा मान गोपाल समाजाचा आहे.येथील गढवाचा बाजार फार प्रसिध्द आहे .दूरदूर वरून गढ़ावांच्या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी व ग्राहक येतात .अनेक भटक्या जातींमध्ये विवाह सोहले येथे पार पडतात .वैदू ,कुंभार ,परीट ,कैकाड़ी ,वडारी इ. भटके जमातीचे लोक विशेष करुन या यात्रेत दिसतात . रंगपंचमी हा यात्रेतला फार महत्वाचा दिवस असतो .जातपंचायताचे उंच ठिकाणी विशिष्ट स्थान आहे .मंदिराचे दार अतिशय लहान असल्याने १२-१५ चे जथ्हे करुन दर्शन घ्यावे लागते.मढ़ीच्या जात पंचायताचे चित्रण 'आस्था ' चित्रपटात दाखविन्यात असल्यामुले दूरदूरच्या भाविकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे .या बाजारात मुंगुस आणि डुकराचे केस विक्री केली जाते डोंगरगण ता . नगर येथे गोरक्षनाथांची समाधी ,तर मढ़ी ता . पाथर्डी येथे कनिफनाथांची समाधी ,जलिंदरनाथांची समाधी ,खोकरमोहो .रेवननाथ समाधी ईट ता .जामखेड ,दीनानाथांची समाधी मुखेड गुप्तनाथ ,राशीन ता.कर्जत ,केसरीनाथ आणि उपबोधननाथ कारखेल,ता .नगर अशी सह्याद्रीच्या डोंगर परिसरात नऊ नाथांचा संचार ,वास्तव्य ,कार्य आपल्याला दिसून येईल .
0 comments:
फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/Post a Comment