Searching...

Vriddheshwar वृधेश्वर

Vriddheshwar वृधेश्वर

अहमदनगरपासून ३५ कि .मी .अंतरावर नाथ संप्रदायचे सर्वश्रेष्ठ असे आदिनाथांचे म्हातारदेव हे स्थान फार पुरातन आहे. प्राचीन महादेवाच्या मंदिरात शिवलिंगतून सतत पानी वाहत असलेले आपल्याला दिसून येते .परिसर अतिशय मनमोहक आहे .गर्भगिरी डोंगररांगेतिल अतिशय सुंदर असे हे स्थान असल्याने भाविकांची येथे सतत वर्दल असते . या परिसरात दुर्मिळ आशा औषधी वनस्पती सापडतात . भव्य सभामंडप,गाभारयात स्वयंभू शिवलिंग ,पुढे नंदी ,कमानीत विणाधारी नारद ,धुनी ,त्रिशूल,हनुमान ,नागमूर्ती या सर्व नाथपंथी दैवते असून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नेवासा येथे लिहून पूर्ण केली . परन्तु पहिली ओवी वृधेश्वरासमोर लिहून आशीर्वाद घेतले असे सांगतात .ज्ञानेश्वर येथे ध्यानधारणा केली तो औदुंबर वुक्ष आजही येथे आहे .दिनकर स्वामींनी सुद्धा येथे साधना केल्याचे सांगतात.९०० वर्षापूर्वी श्रवणपदे व राजाने दिलेली घंटा आजही आहे .मंदिराची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ,बरही महीने सूर्य मावळताना त्याची किरने पिंडीवर पडतात . श्रावणी सोमवारी फार मोठी यात्रा भरते .महाशिवरात्रीला भक्त पैठणहून गंगेच्या पाण्याच्या कावड्या आणतात . वयस्कर निपुत्रिकांना संतती प्राप्त होते अशी श्रद्धा असल्याने या ठिकाणी नवसासाठी फार लोक श्रध्येने येतात.


0 comments:

फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/

Post a Comment

फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/

New Post

Labels

 
Back to top!