Searching...

Mohata Devi मोहटादेवी पाथर्डी

Mohata Devi (मोहटादेवी पाथर्डी)

पाथर्डीपासून ११ किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर असलेले हे शक्तिपीठ "मोहटादेवी" हे अतिशय जागृत स्थान म्हणून समजले जाता असल्याने नगर जिल्ह्यातील शिर्डी,शानिशिंगनपूर प्रमाणे देशाच्या विविध भागातून रोज दर्शनासाठी येणारांचे हे श्रधास्थान बनले आहे. जुन्या दगडी मंदिरात डॉन फुट उंचीचा शेंदूर लावलेला तांदला त्यावर मातेचा चेहरा दिसून येतो. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुले देणग्यांचा ओघही वाढत आहे. तेवा विश्वस्ताकडून परिसरात व मंदिराची विकासकामे वाढत आहेत. मंदिराचे सुशोभीकरण,होमकुंड,कमानी,ओवरया व सभामंडप प्रेक्षणीय आहे.देवीचे स्थान महुर्च्या रेनुकादेवी शक्तिपीठाचे अंशात्मक स्थान मानले जाते. नवरात्रोत्सवात देवीची मोठी यात्रा भरते. ही यात्राआश्विन शु || ११ ला भरते.मोहटादेवीचे विश्वस्त मंडलाचे अध्यक्ष जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आहेत. मंदिर परिसराची उत्तोरोत्तर प्रगती होत आहे. नवसाला पव्नरी जागृत देवी म्हणून सतत भाविकांची गर्दी असते. देवीच्या महिम्याचा मराठी चित्रपट मोहत्याची रेणुका नुकताच प्रदर्शित झाला आहे.भक्तांच्या सोयीसाठी पाथर्डी ते मोहटादेवी बससेवा सुरु आहे.भव्य सभामंडपात सतत अनेक कार्यक्रम,उस्तव,लग्न,समारंभ हॉट असतात.भाविकांना अल्पदरात राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जाते. रुग्न्सेवेसाठी दवाखाना सुरु आहे. नवरात्रोंत्सवात संपूर्ण महाराष्ट्राचे श्रधास्थान असलेल्या मोहटादेवी येथे २५ लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात.आंध्र प्रदेश,मध्य प्रदेश ,गुजरात,कर्णाटक राज्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. शारदीय नवरात्र महोस्ताव ते पौर्णिमेपर्यंत विशेष गर्दी असते. दर मंगलवार,शुक्रवार,रविवार,पौर्णिमेला परिसरातील भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवात गडावर घटस्थापना केली जाते. त्यावेली अनेक भाविक स्त्रिया मंदिरात उपास करुण वास्तव्य करतात.त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्या नवसपूर्ती करुन समाधानी होतात. भाविक उपास काळात पयत चप्पल न घालता वावरतात .कही उभे राहून उपास करतात.मंदिर अता खुप विस्तर्ण व सुन्दर प्रकारे बांधलेले असल्याने भाविकांना चांगल्या सुविधा मिळतात.भक्तनिवासमध्ये आता आणखी विस्तार झालेला आहे.अतिशय मनाला आनंद देणारा परिसर असल्याने पुन्हा पुन्हा जावेसे वाटते.

1 comments:

फक्त मिस कॉल वर व्यवसायाची जाहिरात करा तेही ऑटो मेसेज पाठऊन अधिक महितीसाठी क्लिक करा http://autotextsms.com/ फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/

New Post

Labels

 
Back to top!