सविता फिरोदिया स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईन व डेकोरेशन चा इंटेरियर डिझाईन चा अभ्यासक्रम आता आय. एम. एस. मध्ये
रमेश फिरोदिया एज्यूकेशनल ट्रस्ट च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या सविता फिरोदिया स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईन व डेकोरेशन शैक्षणिक वर्ष सन २०१८ – १९ मध्ये सुरू करण्यात आले.या स्कूल मार्फत दोन वर्षाचा इंटेरियर डिझाईन ऍण्ड डेकोरेशन हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे.या अभ्यासक्रमा करीता प्रतिसाद पाहता सन २०२०-२१ साठीचे प्रवेश सुरु करण्यात येत असून अहमदनगर मधील करोंना पार्श्वभूमी पाहता अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण १ सप्टेंबर २०२० पासून ऑनलाइन किंवा रेग्युलर पद्धतीने (पूर्णवेळ दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत) देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे मुख्य विश्वस्त रमेश फिरोदिया व सल्लागार विश्वस्त डॉ.शरद कोलते यांनी दिली.
संस्था स्तरावर सुरु करण्यात आलेला हा दोन वर्षाचा डिप्लोमा असून यात इंटेरियर डिझाईन व डेकोरेशन संबंधात एकूण १६ विषय व १ प्रबंध अशा स्वरूपातील अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंटेरियर डिझाईन ऍण्ड डेकोरेशन क्षेत्रात उत्तम करियरची संधी निर्माण होतील.
घर, कार्यालय, दुकान आकर्षक सजावट केलेले असावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. मागील काही काळात प्रत्येक जण इंटेरियरबाबत अधिक सजग झाला असून घराची अथवा कार्यालयाची सजावट आनंददायी व लक्षवेधी असावी याकडे कटाक्षाने पाहिले जाते. त्यामुळेच या क्षेत्रात चांगल्या करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेवून नगरमधील रमेश फिरोदिया एज्युकेशन ट्रस्टने सर्वोत्कृष्ट इंटेरियर डिझाईनर , सजावटकार घडवण्यासाठी सविता फिरोदिया स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईन ऍण्ड डेकोरेशन या संस्थेची स्थापना केली आहे.
पूर्णवेळ अभ्यासक्रम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च (आय. एम. एस. सी. डी. आर.) स्टेशन रोड अहमदनगर या शहरातील चांदणी चौकापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या संस्थेत सुरू करण्याचे योजिले आहे . या अभ्यासक्रमासाठी किमान दहावी उत्तीर्ण तसेच इलेमेंट्री, इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. दोन वर्षांच्या या पूर्ण वेळ कोर्समध्ये विद्यार्थ्यांना बेसिक डिझाईन, इंटेरियर डिझाईन, इंटेरियर ड्रॉइंग, मार्केट स्टडी, 2 डी, 3 डी ऍटो कॅड ड्राफ्टींगचे धडे दिले जाणार आहेत. याशिवाय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रोजेक्टही करून घेतला जाणार आहे. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर मार्गदर्शन मिळणार आहे. अभ्यासक्रमासाठी संस्थेने या क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणुक केली आहे. जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर आधारित हा कोर्स विद्यार्थ्यांना इंटेरियर डिझाईन आणि डेकोरेशन क्षेत्रात चांगल्या करियरची संधी मिळवून देणारा आहे. कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी स्वत:चा स्वतंत्र व्यवसायही करू शकतील. कोर्सची रचना करताना संस्थेने राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करून तज्ज्ञांमार्फत अभ्यासक्रम निश्चित केला आहे.
सध्याच्या काळात कौशल्यप्रधान शिक्षणाला महत्त्व आले आहे. इंटेरियर डिझाईन, डेकोरेशन क्षेत्रात कल्पकता, नाविन्यता असलेल्या प्रशिक्षित लोकांना मोठी मागणी आहे. अंतर्गत सजावटीच्या कल्पना सातत्याने बदलत असतात. लोकांनाही सतत नवीन काही तरी हवे असते. घरातील किचनपासून बेडरूमपर्यंत सर्व काही चांगले सजलेले, लक्षवेधी, आकर्षक व आनंददायी असावे असे वाटत असते. दुकाने, कार्यालयातही असेच प्रसन्न वातावरण निर्माण करणारी सजावट करण्यावर भर दिला जातो. यासाठीच चांगल्या व कल्पक इंटेरियर डिझाईनरची गरज असते.
सविता फिरोदिया स्कूल ऑफ इंटेरियर डिझाईन ऍण्ड डेकोरेशनमध्ये या क्षेत्रातील परिपूर्ण विद्यार्थी घडविण्यावर भर दिला जाणार आहे. एका चांगल्या करियरची संधी देणार्या या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी तसेच माहितीपत्रक व नोंदणीसाठी प्रा.प्रकाश सोनार (मो.9890976237) यांना संपर्क साधावा.
0 comments:
फक्त कॉल वर आटो मेसेज पाठवा http://autotextsms.com/Post a Comment